मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शदर पवार यांच्यात प्रदीर्घ चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे पाऊण तासाच्या या बैठकीत उभय नेत्यांनी राज्य आणि देशातील विविध प्रश्नांवर प्रदीर्घ चर्चा केली.

शरद पवार हे विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत असतात. महविकास आघाडीचे मार्गदर्शक या नात्याने ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात. कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, मराठा आरक्षणाचा पेच यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

रविवारी दुपारी शरद पवार यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अनलॉकची पुढील प्रक्रिया आणि राज्यातील कोविड स्थिती यावर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. याशिवाय राज्यातील विविध विकासकामे तसेच केंद्र सरकारने मनमानीपणे मंजूर केलेली कृषी विधेयके यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या