मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर म्हाडात

34

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यातील सनदी अधिकाऱयांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून आज पाच आयएएस अधिकाऱयांच्या  बदल्या करण्यात आल्या आहेत. यात मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती मुंबई ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर नगर महापालिकेचे आयुक्त डी. बी. गावडे यांची आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे एकेकाळचे विश्वासू सचिव म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची अकस्मात बदली झाल्याने वरिष्ठ सनदी अधिकाऱयांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. सी. मंगले यांची नियुक्ती नगर महापालिकेचे आयुक्त म्हणून झाली आहे. नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांची नियुक्ती नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे तर त्यांच्या जागेवर व्ही. व्ही. माने यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या