कोचिंग क्लासला निमित्ताने प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेली तरुणी आणि….

4744

मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीचं नाव तनु परिहार असल्याची माहिती मिळत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, उज्जैन येथील नाना खेडा परिसरात हे हॉटेल आहे. तनु परिहार या हॉटेलमध्ये तिचा प्रियकर असलेल्या सुभाष पोरवालसोबत गेली होती. घरून निघताना तिने आपण कोचिंग क्लासला जात असल्याचं सांगितलं होतं. मात्र, ती कोचिंग क्लासला न जाता सुभाषसोबत हॉटेलवर गेली होती. येथील नटराज नावाच्या हॉटेलमध्ये त्यांनी संध्याकाळपर्यंत एक खोली बुक केली.

दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला सुभाष बाजारातून सामान आणण्यासाठी जातो, अशा बहाण्याने हॉटेलमधून बाहेर पडला. खूप वेळ जाऊनही तो परतला नाही, तेव्हा हॉटेल मॅनेजरला शंका आली. त्याने खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून दरवाजा न उघडल्यामुळे त्याने दरवाजा उघडला तेव्हा आत गादीवर तिचा मृतदेह दिसला.

गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती. सगळी खोली रक्ताने माखली होती. त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला. आरोपी सुभाष हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या