कोब्रा आणि अजगराची जुंपली

106

सिंगापूरमध्ये साधारणपणे अजगर दिसतात, मात्र किंग कोब्रा तसा सहसा आढळत नाही. किंग कोब्रा अत्यंत विषारी असतो. त्याच्या शरीरात ५०० मिलीग्रॅम विष असते. अनेक लहानमोठय़ा सापांना तो भक्ष्य बनवतो. कोब्रा आणि अजगराच्या लढाईचे चित्रीकरण शेल्ड्रन ट्रोलोपी यांनी केले आहे. व्हिडीयोत असे दिसते की लांब, जाडजूड कोब्रा एका अजगराच्या दिशेने झेपावतोय. अजगर म्हणजे कमजोर शिकार असल्याचे कोब्राला वाटते. मात्र प्रत्यक्षात वेगळे घडते. अजगर कोब्राला जमके टक्कर देतो. दोघांत बराच वेळ झुंज सुरू राहाते. सोशल मीडियावरील या व्हिडीयोला आतापर्यंत ८ लाख ५२ हजार व्हूज मिळाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या