3 भाषांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात माजी अष्टपैलू क्रिकेटपटूची भूमिका

588

अजय ज्ञानमुथू निर्मित नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये माजी अष्टपैलू क्रिकेटपटूची देखील भूमिका असणार आहे. ‘कोब्रा’ असं या चित्रपटाचे नाव असून तो तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. दक्षिणेकडचा प्रसिद्ध अभिनेता विक्रम हा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. केजीएफ चित्रपटातील अभिनेत्री श्रीनिधी रेड्डी ही देखील महत्वाच्या भूमिकेत असेल.

हा चित्रपट एप्रिल 2020 मध्ये प्रदर्शित होणार असून याला ए.आर.रहमान यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रम हा जवळपास 24 विविध वेशभूषांमध्ये बघायला मिळेल असं सांगण्यात आलं आहे. यातल्या एका वेशभूषेतील त्याचा लूक हा जानेवारीमध्ये प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. विक्रम हा सध्या मणिरत्नम यांच्या बहुचर्चित चित्रपटात काम करत असून यामध्ये ऐश्वर्या राय, कार्थी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या