World News Photo – जगभरातील काही महत्वाच्या बातम्या वाचा फक्त 8 सेकंदात

980

1 ) बाकड्यावरचा माणूस दुसरीकडे हलवला
अमेरिकेतील आयोवा भागात डग पॉल नावाच्या एका कलाकाराने 110 टनांचे दगडी शिल्प बनविले होते. याला मॅन ऑन बेंच असे नाव देण्यात आले होते. काही कारणांमुळे या शिल्पाची जागा बदलावी लागली असून हे शिल्प मोठ्या मेहनतीने दुसऱ्या जागी हलविण्यात आले आहे.

man-on-bench-restoration

2) 8 महिन्यानंतर कोंबड्याची तुरुंगातून सुटका
कोंबड्यांच्या झुंजी सुरू असताना पाकिस्तानी पोलिसांनी तिथे छापा मारला होता. इथून जप्त केलेल्या एका कोंबड्याची 8 महिन्यानंतर न्यायालयाने सुटका केली आहे. इतर 4 कोंबडे अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. कोंबड्याचे मालक ताबा घेण्यासाठी पुढे न आल्य़ाने पोलिसांनी कोंबडे आपल्या ताब्यात ठेवले होते. या कोंबड्यांचे खाणे-पिणे पोलिसांनाच पाहावे लागत होते. हे कोंबडे रोज 100 रुपयांची बाजरी फस्त करायचे.

cock-1

3) हाया सोफिया मशिद परिसरात ईदची तयारी जोरात
तुर्कस्तानमधील हाया सोफिया ही आता पुन्हा मशिद झाली आहे. या 1500 वर्ष जुन्या वास्तूची निर्मिती चर्च म्हणून करण्यात आली होती. 14 व्या शतकाच ऑट्टोमन साम्राज्यात हे चर्च मशिदीत बदलण्यात आले होते. 86 वर्षांपूर्वी इथे वस्तुसंग्रहालय सुरु करण्यात आलं होतं. तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप आर्दोगान यांनी हे वस्तुसंग्रहालय पुन्हा मशिदीत बदलण्याचे आदेश दिले होते. तिथल्या सर्वोच्च न्यायालयानेही यावर शिक्कामोर्तब केलं होतं. 25 जुलै रोजी इथे पुन्हा नमाझ पढण्यात आली. या मशिदीच्या परिसरात ईदच्या निमित्ताने सध्या जोरात तयारी सुरू आहे.

istanbul-eid-sanitisation

4) कुवेतची हिंदुस्थानी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली
कुवेतने हिंदुस्थानी नागरिकांना देशातील प्रवेशावर बंदी घातली आहे.कोरोना काळात हिंदुस्थानात आलेल्या आणि कुवेतमध्ये रोजगार असलेल्यांना या बंदीमुळे धक्का बसला आहे. आपली नोकरी जाईल अशी त्यांना भीती वाटत आहे. या बंदीमागचे नक्की कारण कळू शकलेलं नाही. ही बंदी तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचं हिंदुस्थानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटलं आहे. हिंदुस्थानसह पाकिस्तान, नेपाळसह एकूण 6 देशांमधील नागरिकांवर ही बंदी घालण्यात आली आहे.

corona-virus-passenger-in-l

5) नासाचे रॉकेट मंगळाकडे झेपावले
युनायटेड लाँच अलायंसचे अॅटलास 5 रॉकेट मंगळाकडे झेपावले आहे. मंगळाचा अभ्यास करण्यासाठीचे रोव्हर घेऊन हे रॉकेट 30 तारखेला अवकाशात झेपावले

alliance-rocket

आपली प्रतिक्रिया द्या