मोठे झुरळ पाहून भेदरला तरुण, मारण्यासाठी ठेवले बक्षीस

3241

झुरळ पाहून काही जण घाबरतात. अनेकजण त्याला मारण्याचा किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करतात. परंतु झुरळ पाहून एक तरुण भेदरला आहे. त्याला मारण्यासाठी त्याने बक्षीसही ठेवले आहे.

भार्गव चावडा 24 वर्षाचा तरुण मूळचा हिंदुस्थानी ऑस्ट्रेलियामध्ये राहतो. सोमवारी त्याला भूक लागली म्हणून तो फ्रीजकडे गेला. तेव्हा त्याला एक मोठे झुरळ दिसले. ते झुरळ पाहून तो चांगलाच घाबरला. त्याला मारून किंवा हुसकावण्याऐवजी त्याने सोशल मीडियावर मदत मागितली.

”हा झुरळ मारायचा आहे. जो कोणी हा झुरळ मारेल त्याला मी 20 डॉलर रुपये देईन. हा झुरळ लिव्हिंग रूम किंवा कीचनमध्ये आहे. त्याला मारण्यासाठी हवं तर स्प्रे घेऊन या कारण माझ्याकडे फक्त झाडू आहे.” असे त्याने गमट्री या सोशल मीडियावर टाकले आहे. अनेक लोकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट केली पण सगळ्यांनी त्याची खिल्ली उडवली. त्याला कोणीच मदत करायला आले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या