केसांसाठीच नाही तर त्वचेसाठीही उपयुक्त आहे नारळाचे तेल

32

सामना ऑनलाईन। मुंबई

केसांसाठी नारळाचे तेल उपयुक्त असते हे सर्वश्रुतच आहे. पण हेच नारळाचे तेल त्वचेसाठीही फायदेशीर आहे. हे आपल्यापैकी फारच कमी जणांना माहित आहे. नारळाचे तेल उत्तम मॉयश्चरायझर असून त्यामुळे त्वचा तुकतुकीत व तजेलदार होते. तसेच चेहऱ्यावरील पिंंपल्सपासून कायमची सुटका होते.

coco

सुंदर दिसण्यासाठी अनेकजण विविध प्रकारच्या क्रिमचा वापर करतात.पण या क्रिम्समध्ये घातक रसायनांचा वापर केलेला असतो. ज्यामुळे काही दिवसातच त्वचा काळवंडते. मग पुन्हा त्वचा उजळ दिसण्यासाठी नवीन क्रिमचा वापर केला जातो. हे सर्व टाळायचे असेल तर नारळाचे तेल वापरावे. नारळाचे तेल वापरल्याने त्वचा टवटवीत तर होतेच शिवाय रंगही उजळतो. नारळाचे तेल क्लिंझरचेही काम करते. जर मेकअप काढायचा असेल तर त्याआधी चेहऱ्याला तेल लावावे. हळूहळू सर्व चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करावी. नंतर कापसाच्या बोळ्याने चेहरा स्वच्छ पूसुन काढावा. डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळंही नारळाचे तेल लावल्याने जातात. डोळ्याखालच्या या काळ्या वर्तृळांमुळे चेहरा थकलेला व डोळे निस्तेज दिसतात. यामुळे तुम्ही कितीही फ्रेश असलात तरी चेहऱ्यावरून मात्र तुम्ही निस्तेज दिसता. हे टाळण्यासाठी रोज रात्री झोपताना चेहऱ्याला नारळाचे तेल लावावे. आठवड्याभरात चेहरा तजेलदार दिसतो.

आपली प्रतिक्रिया द्या