देशभरात थंडीची लाट: लासलगाव गोठले; ७.४ अंश सेल्सिअस

 

नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशात प्रचंड हिमवृष्टी सुरू झाली आहे. उत्तर आणि मध्य हिंदुस्थानात थंडीची लाट पसरली असून येत्या दोन दिवसात ती तीव्र होण्याची शक्यता राष्ट्रीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील लासलगावात पारा ७.४ अंश सेल्सिअस इतका खाली उतरला असून दवबिंदू गोठले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार थंडीचा कहर एक आठवड्यापर्यंत रहाणार आहे. १४ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान जम्मू कश्मिर, हिमाचल प्रदेश, सिमला, उत्तरांचल आदी हिमालयीन भागात प्रचंड हिमवर्षाव आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात थंडीची लाट पसरणार आहे. १५ जानेवारी रोजी सर्वात जास्त बर्फबारी होणार असल्याचे भाकित आहे.

पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानला थंडीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. बिहार, मध्य प्रदेश, विदर्भ आणि ओदिशामध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात नाशिक थंडावले असून पारा घसरला आहे. यंदाचा जिल्ह्यातील निच्चांकी ७.५ इतका पारा खाली आला आहे. भंडाऱ्यात १० अंश सेल्सिअस शीतमान खाली उतरले आहे.

fox-in-ice

अशाच प्रकारची प्रचंड थंडीची लाट सध्या लंडन येथे उसळली आहे. येथील थंडीचा कहर दर्शवणारा एक फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. ९ जानेवारीला फ्रिजीनजेन जवळील डेन्यूब नदी पार करणाऱ्या एका कोल्ह्याचा चक्क बर्फच झाला.