पुढील तीन दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

58
cold-wave

सामना प्रतिनिधी । पुणे

महाराष्ट्रावर चाल केल्याने राज्याला हुडहुडी भरली आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाड्यामध्ये थंडीची लाट आली असून, नागपूर, गोंदिया, परभणी येथे किमान तापमानात मोठी घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातही बोचऱ्या थंडीमुळे गारठा वाढला आहे.

उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कडाका वाढला असून, पूर्व राज्यस्थान येथील अल्वर येथे देशाच्या सपाट प्रदेशात सर्वांत निचांकी ३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी तापमात सरासरीच्या तुलनेत ५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने हुडहुडी वाढली आहे. मराठवाड्यातील परभणी येथे रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा तब्बल ७ अंशांची घट झाली आहे. तर विदर्भातील गोंदिया, नागपूर येथे तापमान सरासरीपेक्षा ६ अंशांनी घसरले आहे.

गोंदिया आणि नागपूर येथे राज्यातील निचांकी ८ अंश सेल्सिअस, तर परभणी येथे ८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्याच्या उत्तर भागाकडे असलेली थंडीची हुडहुडी जानेवारी अखेरपर्यंत कायम राहणार आहे. मात्र दक्षिण भागात रात्रीच्या किमान तापमान हळूहळू वाढत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, संभाजीनगर येथेही गारठा अधिक होता. तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रातच्या काही भागात तापमानात दोन दिवसांपुर्वीच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून आले.

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी नोंदलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.३, अहमदनगर ८.६, जळगाव ८.०, कोल्हापूर १५.८, महाबळेश्वर १३.०, मालेगाव ९.५, नाशिक ८.८, सांगली १३.३, सातारा १०.९, सोलापूर १४.०, मुंबई १९.५, अलिबाग १८.२, भिरा १४.५, डहाणू १४.४, रत्नागरी १७.३, संभाजीनगर ९.८, नांदेड १०.०, परभणी ८.५, अकोला १०.१, अमरावती १२.६, बुलढाणा १२.०, चंद्रपूर ११.०, गोंदिया ८.०, नागपूर ८.०, वर्धा ११.२, यवतमाळ ११.४.

आपली प्रतिक्रिया द्या