‘बागी २’ची १०० कोटींच्या क्लबमध्ये धडक

45

सामना ऑनलाईन । मुंबई

टायगर श्रॉफचा ऍक्शनपट ‘बागी २’ या चित्रपटाने अवघ्या ६ दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये धडक दिली आहे. ‘बागी २’ ने १०४ कोटी ९० लाख रुपयांचे कलेक्शन केले आहे.
टायगर श्रॉफ हा तसा बॉलीवूडचा उभरता कलाकार. त्याच्या नावावर आतापर्यंत जेमतेम ५ चित्रपट जमा होते. असे असतानाही त्याची १०० कोटींच्या क्लबमधील एंट्री सर्वांना चकीत करून गेली आहे. हा टप्पा गाठणारा टायगर हा सर्वात लहान बॉलीवूड स्टार ठरला आहे. गेल्या आठवडय़ात ‘बागी २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून बागीने प्रेक्षकांना खेचले आहे. ओपनिंगलाच ‘बागी २’ ला दमदार कलेक्शन मिळाले आहे. विकेंडला सर्वाधिक कलेक्शन मिळवून देणारा हा २०१८ सालातील दुसरा चित्रपट ठरला आहे. या कामगिरीमुळे टायगर बॉलीवूडचा लाडका बनला नाही तर नवलच. हृतिक रोशन याने आधीच ऍक्शन हिरोचा किताब देऊन टायगरला गौरवले आहे. आता अक्षयकुमार आणि अनिल कपूर यांनीही या युवा कलाकाराचे कौतुक केले आहे. टायगरने ‘बागी २’च्या यशाबद्दल पालकांचे आणि सर्व सहकलाकारांचे आभार मानले आहेत. प्रेम आणि पाठींब्याबद्दल मेन्टॉर साजिद नाडीयादवाला यांचेही खास आभार त्याने मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या