हंगा तलावाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून जलपूजन

466

पारनेर शहरासह हंगा व लोणीहवेली गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणारा हंगा लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी मंगळवारी हंगा तलावावर जाउन जलपूजन केले. गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस झाला नसल्याने हंगा तलावामध्ये पुरेसा पाणीसाठी झाला नव्हता. त्यामुळे पारनेर शहरासह लोणीहवेली तसेच हंगा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होउन तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. पारनेर शहरासाठी तर सुपे औद्योगिक वसाहतीमधून पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत होते.

गेल्या वर्षी तलावातील पाणीसाठा पूर्णपणे संपल्याने जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी तलावातील गाळ उपसण्यासाठी तात्काळ मंजुरी दिल्यामुळे उद्योजक अभय फिरोदिया यांनी जैन संघटनेच्या माध्यमातून 40 हजार घनमीटर गाळाचा उपसा करून तो शेतकऱ्यांना दिला. तर शेतकरी वर्गानेही 30 हजार घनमीटर गाळ स्वतः उचलून नेल्यामुळे एकूण 70 हजार घनमीटर गाळ उपसला गेला होता. त्यामुळे तलावाच्या साठवण क्षमतेमध्ये सुमारे 70 कोटी लिटरने वाढ झाली आहे. हंगा लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पिण्याच्या पाण्याची किमान दोन वर्षांची टंचाई दूर झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी तलावास भेट देत जलपूजन केले. दरवर्षी मुबलक पाऊस होऊन तलाव दरवर्षी ओसंडून वहावा अशी प्रार्थना केली.व्दिवेदी यांच्यासह तहसीलदार ज्योती देवरे, नगराध्यक्षा वर्षा नगरे,नगरसेवक किसन गंधाडे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, आदेश चंगेडीया, चंदन भळगट, अक्षय पाठक, सुभाष दुधाडे, विजय डोळ, संताष गांधी, मनोज गांधी, प्रशांत बोरा, अरूण भंडारी, सुभाष गांधी, कमलेश गांधी, मयुर महांडूळे, डॉ. प्रमोद पितळे, तुषार औटी, सचिन पठारे आदी यावेळी उपस्थित होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या