युपी : राज्यरानी एक्सप्रेसची टँकरला धडक, एकाचा मृत्यू

34

सामना ऑनलाईन । लखनौ

रेल्वेमागील अपघाताचे शुक्लकाष्ट काही अजूनही सुटलेले नाही. सुरेश प्रभू गेले आणि पियूष गोयल आले तरी रेल्वे अपघातात घट होताना दिसत नाहीये. ताज्या घटन्यात उत्तर प्रदेशमध्ये लखनौ-मेरठ राज्यरानी एक्सप्रेसची एका टँकरला धडक झाली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनी दिली आहे.

बुधवारी सायंकाळी हरदोई जिल्ह्यातील गौसगंजजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. राज्यरानी एक्सप्रेसची टँकरसोबत जोरदार धडक झाल्याने एकाचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक लोकांनी अपघातात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती केले आहे. जखमीमधील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या