…आणि पृथ्वीवर सोन्याची निर्मिती झाली!

136

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

लग्नसमारंभ असो किंवा सणउत्सव सोन्याचे दागिने परिधान करून मिरवण्याची हौस महिला आणि पुरुष दोघांनाही आहे. आता हे सोने पृथ्वीवर कसे आले, त्याचा शोध कुणी लावला, खरंच सोने खाणीत सापडते का…? असे प्रश्न जर तुमच्या डोक्यात येत असतील तर वैज्ञानिकांच्या एक टीमने नुकत्याच केलेल्या संशोधनातून या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. या संशोधनानुसार पृथ्वीच्या निर्मितीच्या सुरुवातीला चंद्राच्या आकाराचा एक भूमंडलीय ग्रह पृथ्वीवर येऊन आदळला. पृथ्वी आणि या ग्रहाच्या संपर्कामुळे पृथ्वीवर सोने आणि प्लॅटीनमसारखे मौल्यवान धातू पोहोचले.

नासाच्या मदतीने ‘साऊथवेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅण्ड’च्या वैज्ञानिकांनी याविषयीचे संशोधन केले आहे. याविषयीची माहिती स्टडी नेचर जियोसायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. पृथ्वीच्या निर्मितीच्या काळात विविध ग्रह पृथ्वीवर आदळण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे त्यावेळी पृथ्वीने अनेक स्फोट झेलले आहेत. या स्फोटांमुळे पृथ्वीच्या अंतर्गत भूभागात मौल्यवान धातू आणि खनिजांची उत्त्पती झाली.

आपली प्रतिक्रिया द्या