पुणे – लेफ्टनंट कर्नल पदावरील महिलेची आत्महत्या

लेफ्टनंट कर्नल पदावरील महिलेने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास या महिलेने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्या केलेल्या महिलेचे वय हे 43 वर्षांच्या आसपास असावे असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.

लेफ्टनंट कर्नल या मूळच्या उत्तराखंडच्या असून त्या जयपूर इथे तैनात होत्या. लेफ्टनंट कर्नल या प्रशिक्षणासाठी पुण्याला आल्या होत्या. या महिलेचे लग्न सैन्य दलातील अधिकाऱ्याशी झाले होते आणि ते कर्नल पदावर कार्यरत होते. दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याने दोघांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला होता. पोलिसांना आत्महत्या केलेल्या महिलेच्या वडिलांचे पत्र मिळाले असून त्याच्या आधारे पोलिसांनी तर्क लावला आहे की आत्महत्या करणाऱ्या महिलेने हे टोकाचे पाऊल कौटुंबिक वादामुळे उचलले असावे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वडील हे देखील सैन्य दलात होते.

आपली प्रतिक्रिया द्या