ऑनलाईन स्पर्धेत हरल्यामुळे लाईव्ह येऊन 7 बाटल्या दारू प्यायला, काही वेळातच झाला मृत्यू

सोशल मिडियावर प्रसिद्धि मिळवण्यासाठी लोकं हल्ली वेगवेगळ्या मार्गांची निवड करतात, मात्र काही वेळा या पद्धती घातकही ठरू शकतात. अलीकडेच एका व्यक्तीने सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अतिशय घातक पद्धतीचा अवलंब केला. या व्यक्तिने नेमके काय केले, हे वाचून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

ही घटना चीनमध्ये घडली आहे. डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वांग (34) हा तरुण चिनी सोशल मिडियावर खूपच प्रसिद्ध होता. शॉर्ट व्हिडियो अॅप Douyin वर त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. सोशल मिडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही त्याचा चांगला चाहतावर्ग होता.तो अनेक त्याच्या अकाउंटवरून दारू पितानाचे व्हिडियो पोस्ट करत असे. नुकतेच त्याने लाइव्ह व्हिडिओवर एकामागून एक दारूच्या 7 बाटल्या पिऊन व्हिडियो पोस्ट केला होता. हा व्हिडियो पोस्ट केल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ त्याने फक्त आपल्या फॉलोअर्सना दाखवण्यासाठी बनवला होता.

वांगने गेल्या मंगळवारी लाइव्ह स्ट्रीमदरम्यान बैज्यू वाइनच्या 7 बाटल्या प्याला. काही तासांनंतर तो मृतावस्थेत आढळला. वांगच्या शरीरात 60% अल्कोहोल गेले. सध्या वांगचा मृत्यू हा चीनच्या इंटरनेटवर चर्चेचा विषय झाला आहे. देशातील वेगाने वाढणाऱ्या लाइव्ह स्ट्रीमिंग उद्योगासाठी वापरकर्ते कठोर नियमांची मागणी करत आहेत.

प्रत्यक्षात वांगने सोशल मिडियावरील एका स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये, दुसर्‍या प्रभावशाली व्यक्तीकडून पराभूत झाल्यानंतर, त्याला ‘शिक्षा’ म्हणून मर्यादित कालावधीत जास्त दारू प्यावी लागली. आपल्या अनुयायांना लाइव्ह दाखवण्यासाठी त्याने दारू पिण्यास सुरुवात केली. तो उत्साहाच्या भरात 7 बाटल्या दारू प्याला. त्यानंतर काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला.

वांगच्या एका मित्राने सांगितले की, त्याचे कुटुंबिय त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो मरण पावला होता. वांग यांच्यावर तातडीने उपचार करण्याची संधीही मिळाली नाही.शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वांग यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

अहवालानुसार, Douyin अॅपने लाइव्ह स्ट्रीम दरम्यान मद्यपानावर आधीच बंदी घातली आहे, पण हे लोक मान्य करायला तयार नाहीत. वांगला यापूर्वी मद्यपान केल्याबद्दल अॅपवरून निलंबित करण्यात आले होते, परंतु नवीन खाती तयार करून तो अॅपवर परत आला होता.

सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी घडलेली ही पहिलीच घटना नाही. याआधीही चीनमध्ये लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान वापरकर्त्यांना जास्त खाणे किंवा पिणे यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 2021 मध्ये, Douyin वर जास्त खाण्यासाठी लोकप्रिय असलेल्या Yu Hailong नावाच्या प्रभावशाली व्यक्तीचा मृत्यू झाला. 2018 मध्ये, अल्कोहोल आणि स्वयंपाकाचे तेल ऑनलाइन सेवन करणाऱ्या लाइव्हस्ट्रीमरचा मृत्यू झाला होता.