कपिल शर्माला टक्कर देणार ‘कॉमेडी कंपनी’

43

सामना ऑनलाईन । मुंबई

सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील भांडणामुळे ‘दि कपिल शर्मा शो’ला उतरती कळा लागली. कपिलच्या शोला टक्कर देण्यासाठी त्याचे सहकलाकार आता त्याच वाहिनीवर ‘कॉमेडी कंपनी’ नावाने सुरू होणाऱ्या नवीन शोंमध्ये झळकणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या शोसाठी कपिलच्या सहकलाकारांनी कपिलचा कट्टर शत्रू समजल्या जाणाऱया कॉमेडियन कृष्णा अभिषेकशी हातमिळवणी केली आहे.

सिडनी दौऱ्याहून परतताना कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या भांडणामुळे सुनीलसह कपिल शर्मा शोमधील चंदन प्रभाकर, अली असगर, सुगंधा मिश्रा यांनी शोला रामराम केला होता. नवीन शोबद्दलच्या बातमीला कॉमेडियन कृष्णाने दुजोरा दिला असला तरी अद्याप त्याने याबद्दल फारशी माहिती दिली नाही. कपिलचा शो ऑफएअर गेल्यावर त्या जागी हा नवीन शो येणार असल्याचीही चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या