LPG Gas Price व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात, घरगुती गॅस सिलिंडरचं काय?

आज (1 एप्रिल, 2023) नव्या आर्थिक वर्षाचा पहिलाच दिवस असून देशभरात काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्येही बदल करण्यात आले आहेत. आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्यांनी या शक्यतांचा ‘एप्रिल फूल’ करत सिलिंडरच्या किंमतींमध्ये कपात केली आहे.

सरकारी तेल कंपन्यांकडून व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारित केल्या जातात. त्यानुसार आज व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतींमध्ये 91.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत आता 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडरसाठी 2080 रुपये मोजावे लागत आहेत तर कोलकातामध्ये 2132, मुंबईत 1980 रुपये आणि चेन्नईमध्ये 2192.50 रुपये मोजावे लागतील.

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतींमध्ये कपात करण्यात आली असली तरी 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमती ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती 350 रुपयांनी आणि घरगुती सिलिंडरच्या किंमती 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या.

एप्रिल फूल नव्हे! आजपासून खरंच तुमचा खिसा कापला जाणार

आता 1 एप्रिलला व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतींमध्ये घट करण्यात आली असली तरी घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमती जैसे थे ठेवण्यात आल्याने सर्वसामान्यांना आधीप्रमाणेच पैसे मोजावे लागणार आहेत.

देशातील प्रमुख शहरातील घरगुती सिलिंडरच्या किंमती –

दिल्ली – 1103
पाटणा – 1202
अहमादाबाद – 1110
मुंबई – 1112.5
लखनौ – 114.50
कोलकाता – 1129
चेन्नई – 1118.50