देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे

देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे. सर्व राज्यांनी यावर विचार करावा. जी राज्ये हा कायदा लागू करतील ते निश्चितच अभिनंदनास पात्र असतील, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हा अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राजनाथ सिंह यांनी संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. हिंदू-मुस्लिम असा भेदभाव आम्ही निर्माण करत नाही तर कॉँग्रेस पक्ष करतो. त्यांना समजवा, मंदिरांसाठी पैसे का द्यायचे नाहीत? मंदिरे आमचा सांस्कृतिक वारसा आहेत. तो आपण जपला पाहिजे. अ‍ॅण्टी रेडिक्लायझेशन सेल बनवले पाहिजे, असे ते म्हणाले.