राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आज उद्घाटन

18

सामना ऑनलाईन, गोल्ड कोस्ट

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शंखनाद होण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने तब्बल ७१ देशांचे खेळाडू ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरात डेरेदाखल झाले आहेत. हिंदुस्थाननेही २२७ खेळाडूंचे पथक जय्यत तयारीनिशी ऑस्ट्रेलियाच्या स्वारीवर पाठविले आहे. २०१०साली मायदेशात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानने १०१ पदकांची कमाई केली होती. यावेळी पुन्हा एकदा हिंदुस्थानकडून पदकांचे शतक अपेक्षित आहे.

सीजीएफ न्यायालयाने हिंदुस्थानी डॉक्टरला फटकारले

राष्ट्रकुल क्रीडा संघटनेच्या (सीजीएफ) न्यायालयाने हिंदुस्थानी पथकाच्या शिबिराजकळून सीरिंज आढळल्याप्रकरणी हिंदुस्थानी डॉक्टरला चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले की, सीरिंज योग्य पद्धतीने डिस्पोज न करण्याची चूक पुन्हा होता कामा नये. ३० मार्चला अशा बातम्या आल्या होत्या की, हिंदुस्थानच्या एका बॉक्सरच्या खोलीत सीरिंज सापडल्या आहेत. त्यानंतर ‘सीजीएफ’चे सीईओ डेव्हिड ग्रेकेमबर्ग यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने हिंदुस्थानी डॉक्टर अमोल पाटील यांना ‘नो निडल पॉलिसी’च्या पॅरा एक आणि दोनप्रकरणी उल्लंघन केल्याने दोषी ठरवले. त्यांनी सीरिंज योग्य ठिकाणी डिस्पोज केले नाही. एक बॉक्सर आजारी होता. त्याला पाटील यांनी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन दिले होते. इंजेक्शन दिल्यानंतर त्यांनी सीरिंज खोलीतच सोडले. त्यांनी ते पॉलि क्लिनिकमध्ये नेऊन डिस्पोज करायला हवे होते.

आपली प्रतिक्रिया द्या