CWG 2022 टेबल टेनिसमध्ये शरथ-कमलला सुवर्ण पदक; हिंदुस्थानची बॅडमिंटनमध्ये सोनेरी हॅट्रिक

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2022) हिंदुस्थानला आज दिवसात तिसरं सुवर्णपदक मिळालं. बॅडमिंटनमधील हिंदुस्थानची ‘सुवर्णकन्या’ पीव्ही. सिंधू, पुरुष एकेरीत चमकदार कामगिरी करणारा लक्ष्य सेन या दोघांच्या पाठोपाठ सात्विक-चिराग यांनी सुवर्ण कमाई केली. तर शरथ-कमल याने टेबल टेनिसमध्ये सुवर्ण पदक जिंकलं.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिस एकेरीच्या अंतिम सामन्यात अचंत शरत कमलने विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात अचंतने अंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा पराभव केला. त्याने 11-13, 11-7, 11-2, 11-6, 11-8 अशा सेटमध्ये विजय मिळवला आहे.

अचंतने शरत कमलने तिसरा सेट 11-2 अशा फरकाने जिंकत 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतरचे सेट जिंकत त्याने विजय मिळवला. राष्ट्रकुल स्पर्धेत त्याचे हे दुसरे पदक आहे. याआधी त्याने टेनिस मिश्र दुहेरीतही पदक मिळवले होते. अचंत आणि श्रीजा अकुला जोडीने अंतिम सामन्यात मलेशियाच्या जावेन चुंग आणि कारेनलाइने चा पराभव केला होता.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानला आज दिवसात बॅडमिंटनमध्ये तिसरे सुवर्णपदक मिळालं. बॅडमिंटनमधील हिंदुस्थानची ‘सुवर्णकन्या’ पीव्ही. सिंधू, पुरुष एकेरीत चमकदार कामगिरी करणारा लक्ष्य सेन या दोघांच्या पाठोपाठ सात्विक-चिराग यांनी सुवर्ण कमाई केली. परुष दुहेरीत अंतिम सामन्यात सात्विक साईराज रैंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. त्यांनी इंग्लंडच्या लेन बेन आणि सीन मेंडी जोडीचा पराभव केला आहे.

सात्विक-चिराग ने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या लेन बेन आणि सीन मेंडी यांचा 21-15, 21-13 असा पराभव केला. सात्विक साईराज रैंकी रेड्डी आणि चिराग शेट्टीने उपांत्य सामन्यात मलेशियाच्या चैन पैंग सून आणि टॅन कियान मेंग या जोडीचा 21-6, 21-15 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.