राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी, हिंदुस्थानी हॉकी संघ घोषित

हॉकी इंडियाने पुढच्या महिन्यात बार्ंमगहॅम, इंग्लंड येथे खेळवल्या जाणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानी हॉकी संघाची घोषणा आज केली. हिंदुस्थानचे नेतृत्व 41 वर्षांनंतर देशाला हॉकीचे ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱया मध्यरक्षक मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे. शिवाय, या संघात अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आणि कृष्ण बहादूर थापा यांनी पुनरागमन केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला कास्यपदक मिळवून देणाऱया संघातील 11 हॉकीपटूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडच्या बार्ंमगहॅम शहरात यंदाची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 28 जुलै 2022 ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत खेळवली जाणार आहे.

हिंदुस्थानी संघ

गोलरक्षक ः पी.आर. श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक

बचावपटू ः वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह (उपकर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंह, जरमनप्रीत सिंह

मध्यरक्षक ः मनप्रीत सिंह (कर्णधार), हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंह, आकाशदीप सिंह, नीलाकांता शर्मा

फॉर्वर्डस्  ः मनदीप सिंह, गुरजंट सिंह, ललितकुमार उपाध्याय, अभिषेक

राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानच्या लढती

पहिली लढत ः 31 जुलै, हिंदुस्थान विरुद्ध घाना ः सायंकाळी  7 ः30 पासून; दुसरी लढत ः 1 ऑगस्ट, हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड ः सायंकाळी 7.30 पासून; तिसरी लढत ः 3 ऑगस्ट, हिंदुस्थान विरुद्ध कॅनडा ः सायंकाळी 7.30 पासून;

चौथी लढत ः 4  ऑगस्ट, हिंदुस्थान विरुद्ध  वेल्स ः  सायंकाळी 7.30 पासून