
आंतरधर्मीय प्रेमसंबंधातून दोन गटांमध्ये हिंसाचार झाल्याची घटना कर्नाटकच्या कोप्पल जिह्यातील हुलीहायडर गावात घडली. या घटनेत दोघांना मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाशा वाली (22) आणि येनाकापा तलवाड (60) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाकडून परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
माहितीनुसार, एका हिंदू मुलाचे मुस्लिम मुलीवर प्रेम होते. मोहरमच्या एका कार्यक्रमादरम्यान हा मुलगा मुलीला भेटायला गेला होता. याची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर तेदेखील घटनास्थळी दाखल झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटांत लाठय़ा-काठय़ा, शस्त्रs घेऊन जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सहाजण गंभीर जखमी आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.