मूर्ती विसर्जनावेळी धर्मांधांचा राडा, जहानाबाद जिल्ह्यात कलम 144 लागू

2261

बिहारमध्ये दुर्गा प्रतिमेच्या विसर्जनावेळी धर्मांधांनी तुफान राडा केला आहे. जहानाबाद जिल्ह्यात मूर्ती विसर्जनावरून दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष उसळला. यानंतर संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. तणावाच्या या परस्थितीमध्ये पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 लागू केले असून मूर्ती विसर्जनावर बंदी घातली आहे.

jahanabad2

बुधवारी दुर्गा प्रतिमा विसर्जानावेळी धर्मांधांनी मिरवणुकीवर तुफान दगडफेक केली. यामध्ये दुर्गा मातेची मूर्ती भंग पावली. यानंतर मोठी दंगल उसळली. विसर्जनामध्ये सहभागी झालेल्या आणि दगडफेक केलेल्या लोकांनी दुकानांची, गाड्यांची तोडफोड केली. यावेळी धार्मिक स्थळांना आगही लावण्यात आल्याने हिंसाचाराने रौद्ररुप धारण केले. दगडफेक आणि हिंसाचारामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

jahanabad1

दरम्यान, हिंसाचार उसळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाद शमवण्याचा प्रयत्न केला. जहानाबादचे जिल्हाधिकारी नवीन कुमार, पोलीस अधिकारी मनीष दल हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. गर्दीला पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. दोन धर्मातील हा वाद संपूर्ण जिल्ह्यात उसळू नये म्हणून एसडीओच्या आदेशावरून कलम 144 लागू करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या