मुस्लिम दहशतवादी संघटनांची नक्षलवाद्यांना मदत, माकपा नेत्याचा गंभीर आरोप

504

मुस्लिम दहशतवादी संघटना (Muslim Terror Outfits) नक्षलवाद्यांना आणि माओवाद्यांना मतद करत असल्याचा गंभीर आरोप माकपा नेते पी. मोहनन (P. Mohanan) यांनी केला आहे. मंगळवारी ट्वीट करून त्यांनी नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट (एनडीएफ) आणि इस्लामी कट्टरवादी संघटना नक्षलवाद्यांना सहकार्य करत असल्याचा आरोप केला. केरळमध्ये मुस्लिम दहशतवादी नक्षलवाद्यांना खतपाणी घालत असून त्यांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. केरळमध्ये मुस्लिम दहशतवादी नक्षलवाद्यांची मोठी ताकद बनल्याचा आरोपही त्यांनी केला.

माकपाचे कोझिकोड जिल्हा सचिव पी मोहनन यांनी मंगळवारी दावा केला ही मुस्लिम दहशतवादी संघटना नक्षलवाद्यांना हत्यारं पुरवत असून त्यांना प्रशिक्षणही देत आहेत. नक्षलवाद वाढण्यासाठी मुस्लिम दहशतवादी संघटना त्यांना खतपाणी घालत असल्याचा आरोप मोहनन यांनी केला. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले.

केरळमध्ये गेल्या काही वर्षामध्ये इसिसमध्ये सहभागी झालेल्या अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. 2017 मध्ये केरळ पोलिसांनी राज्यातील तब्बल 10 तरुण इसिसमध्ये भरती झाल्याची भिती व्यक्त केली होती. पोलिसांनी व्हॉट्सअॅप कॉल, टेलिग्राम मेसेज, सोशल मीडियाच्या माध्यामातून 300 पेक्षा अधिक ऑडिओ क्लिप आणि मेसेज पुरावे म्हणून गोळा केले होते. आता मोहनन यांच्या वक्तव्यातून केरळमध्ये इसिसचे वर्चस्व आणि धोका आणखी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

श्रीलंकेतील स्फोटाच्या केरळमध्ये जुळल्या तारा
याआधी श्रीलंकेत इस्टर डे च्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या तारा केरळशी जुळल्या होत्या. एप्रिल 2019 ला एएनआयने या प्रकरणी केरलमध्ये छापेमारीही केली होती आणि काही संशयितांना अटकही केली होती. संशयितांकडे झाकिर नाईक याच्या भाषणाच्या सिड्या आणि डीव्हीडी मिळाल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या