कंपनी आणि कर्मचाऱ्यांकडून ‘पीएफ’मध्ये १२ टक्केच योगदान राहणार

सामना ऑनलाईन । पुणे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून कर्मचारी आणि कंपनीचा ‘पीएफ’मधील हिस्सा कमी करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला. पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये कर्मचारी, उद्योजक आणि सीबीटी (सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज) यांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे पीएफ कमी करण्याचा निर्णय फेटाळला गेला.

यापुढेदेखील कंपनी आणि कर्मचाऱ्यांकडून पीएफमध्ये प्रत्येकी १२ टक्केच योगदान सुरू राहणार आहे. कर्मचाऱयांनी केलेला विरोध लक्षात घेता याबाबतच निर्णय केंद्र सरकार घेईल असे केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या