माभळे गावात जमिनधारकांना नुकसान भरपाई वाटप

26

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाने आता वेग घेण्यास सुरुवात केली असून आज संगमेश्वर जवळील माभळे गावात ६९ पैकी कागदपत्रांची योग्य पुर्तता करणाऱ्या ४० शेतकऱ्यांना जमिनीच्या नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आली. संगमेश्वर नजिकच्या माभळे गावातील ६९ जमिन मालकांच्या जमिनींचे चौपदरीकरणासाठी अधिग्रहण करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमुळे महामार्ग चौपदरीकरणात बाधीत होणाऱ्या जमिनमालकांची नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त असूनही देण्यात आली नव्हती. निवडणूका संपन्न होवून महिनाभराचा कालावधी झाल्यानंतर नुकसान भरपाई वाटपाच्या प्रक्रियेने आजपासून वेग घेतला आहे . माभळे गावातील ६९ जमिन मालकांना आज माभळे तलाठी कार्यालयात जमिनीची नुकसान भरपाई बॅंक खात्यात जमा होण्याबाबत आवश्यक कागदपत्रं घेऊन उपस्थित राहण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या होत्या. यापैकी ४० जमिन मालकांनी आपली आवश्यक कागदपत्रे महसूल यंत्रणेकडे सुपूर्द केली.

आपली प्रतिक्रिया द्या