स्टार खेळाडू हार्दिक पंड्या येणार गोत्यात; तिरंग्याचा अवमान, वकिलाची पोलीस ठाण्यात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषावेळी हिंदुस्थानचा झेंडा तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप करीत पुण्यातील वकिलाने स्टार खेळाडू हार्दिक पंड्या याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. ऍड. वाजिद खान यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली तक्रार आहे. त्यासोबतच वकिलांनी पंड्याने मैत्रिणीसोबत तिरंग्यासोबत डान्स केल्याचा व्हिडिओही सोबत जोडला आहे.

हिंदुस्थान क्रिकेट संघाने टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्या न्यूझीलंडवर विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडियाने न्यूझीलंडवर ऐतिहासिक वजय मिळवल्यानंतर खेळाडूंनी जल्लोष केला. त्यानंतर खेळाडूंचे कुटुंबीय मैदानात आले होते. त्यावेळी स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची गर्लफ्रेंडही मैदानात आली होती.

विजयाचा जल्लोष करताना पंड्याच्या खांद्यावर हिंदुस्थानचा तिरंगा झेंडा होता. अंगावर तिरंगा झेंडा घेऊन तो मैत्रिणीसोबत अश्लील चाळे करीत असल्याचा आरोप ऍड. वाजिद खान यांनी केला आहे. पंड्याने तिरंग्याचा अपमान केल्यामुळे राष्ट्रीय गौरव अवमान अधिनियम कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

हार्दिक पंड्या सोशल मीडियावर ट्रोल

विजयाचा आनंद साजरा करताना हार्दिक पंड्याचे गर्लफेंडला सोबत घेतले होते. त्यावेळी दोघांनी विक्षिप्त डान्स केल्याची प्रतिक्रिया नेटीझेन्सनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. या व्हिडिओवरून अनेक नेटकऱ्यांनी पंड्याकर टीका केल्याचे कमेंटसद्वारे दिसून आले होते. दरम्यान, आता ऍड. वाजिद खान यांनीही आक्षेप घेतला असून, त्यांनी पंड्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.