अर्जन रामपालविरोधात पोलिसात मारहाणीची तक्रार दाखल

28

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सिनेअभिनेता अर्जुन रामपालवर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवी दिल्लीच्या पंचतारांकीत हॉटेलमधील नाईट क्लबमध्ये हा सगळा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या मारहाणीत एका व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

मारहाण झालेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, नाईट क्लबमध्ये अर्जुन रामपाल डीजे वाजवत असतांना एक फोटोग्राफर त्याचे फोटो काढत होता. फोटोग्राफरचे फोटो काढणे अर्जुनला खटकले आणि नाराज होत अर्जुनने त्याचा कॅमेरा लोकांकडे फेकला. तो कॅमेरा एका व्यक्तीच्या डोक्याला लागून तो व्यक्ती जखमी झाला आहे. ज्यावेळी पीडित व्यक्ती घटनेचा जाब विचारायला गेला तेव्हा अर्जुन रामपालच्या बाऊंसर्सनी त्याला हॉटेल बाहेर काढून दिले. मध्यरात्री साडेतीन वाजताची ही संपूर्ण घटना आहे. पीडित व्यक्तीने पोलिसांत यासंबधी तक्रार दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या