पंकज भुजबळ यांच्याविरोधात धमकावल्याची तक्रार

21

सामना ऑनलाईन, मुंबई

मनी लॉण्डरिंग कायद्याखाली अटकेत असलेले छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा पंकज यांनी धमकावल्याचा आरोप एमईटी प्रकरणातील सहआरोपी अमित बलराज आणि सुधीर साळसकर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

न्यायालयात सुनावणीदरम्यान पंकज भुजबळ यांनी दमदाटी केली. तुझे काम झाले ना, मग चालता हो. नाहीतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप अमित बलराजने केला आहे. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या