‘एनएसएल शुगर्स’ कारखान्यावर टांगती तलवार, मालमत्ता विकून पैसे देण्याचे आदेश

20
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । बीड

शेतकऱ्यांचे पैसे थकवल्यामुळे शंभू महादेव कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त करून पंधरा दिवसाचा कालावधी होत नाही तोच चालू हंगामातील बीड जिल्ह्यातील पवारवाडी येथील एनएसएल शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकवलेले ८४ कोटी रूपये देण्यासाठी कारखान्याची गाळप केलेली साखर, मॉलेसीस बॅग्स तसेच गरज पडल्यावर स्थावर मालमत्ता विक्री करून पेमेंट अदा करण्याचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील अत्यंत दर्जेदार आणि सचोटीचा कारखाना म्हणून माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील एनएसएल शुगर कारखान्याकडे पाहिले जात होते. मात्र या खाजगी कारखान्याने चालू हंगामातील शेतकऱ्यांचे ८६ कोटी थकवले. पाच महिन्यापासून शेतकऱ्यांच्या पदरात दमडीही न पडल्याने तक्रारदार राजेंद्र होके यांनी साखर आयुक्तांकडे धाव घेतली. शेतकरी आणि कारखान्यामध्ये त्यानंतर एक तोडगाही काढण्यात आला. मात्र कारखान्याने शब्द पाळला नाही. अखेर साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्यासाठी कारखान्याची साखर, मॉलेसीस, बॅग्स आणि गरज पडल्यावर स्थावर जंगम मालमत्ता विंक्री करून शेतकऱ्यांची बिले देण्यात यावीत असा आदेश बीडच्या जिल्हाधिकारी यांना दिला आहे. यामुळे कारखानदारामध्ये खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या