तालिबान प्रवक्त्याचं ट्विटर अकाउंट सुरू, पण ट्रम्पचं बंद? अमेरिकेत वादाला तोंड फुटलं

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता सोशल मीडियावर ते स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याच्या खटपटीला लागले आहेत. सोशल मीडियावर आपल्या सगळ्या कार्यक्रमाची माहिती ते देत आहेत. पण, हेच आता वादाचा नवीन मुद्दा बनलं आहे.

याचं कारण ठरलेत, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट डीलिट करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे तालिबान्यांचं अकाउंट मात्र बिनघोर सुरू आहे. अमेरिकेत झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचं अकाउंट बंद करण्यात आलं होतं.

त्यामुळे अमेरिकेत आता एक नवीन वाद उफाळला आहे. अमेरिकेतली रिपब्लिकन पार्टीचे नेते मेडिसन यांनी ट्वीट करून हा प्रश्न विचारला आहे. ते विचारतात की, नेमकं काय कारण आहे की ज्यामुळे तालिबानच्या प्रवक्त्याचं ट्विटर अकाउंट सुरू आहे आणि अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचं अकाउंट बंद करण्यात आलं आहे? अमेरिकेतील मोठ्या टेक कंपन्या नेमक्या कुणासोबत आहेत?

फेसबुकने तालिबानला समर्थन देण्यास नकार दिला असून त्यांचे कोणतेही अकाउंट्स उघडू देणार नसल्याची घोषणा केली आहे. पण ट्विटरने मात्र अद्याप अशी कोणतीही कारवाई केलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या