या देशात सापडला सोन्याचा पर्वत, पाहायला हजारो लोकांची गर्दी

जुना, दडलेला खजिना, सोन्याने किंवा मौल्यवान धातूंचा साठा असलेला डोंगर याबाबत अनेकांना प्रचंड उत्सुकता असते. लहानपणापासून आपण अनेक गोष्टींमध्ये अशा प्रकारच्या सोन्याच्या डोंगराचा उल्लेख ऐकत आलो आहोत. पण, एका देशात खरोखर असा डोंगर सापडला आहे.

हा देश आहे आफ्रिका खंडातील काँगो. काँगोमध्ये एक सोन्याचा पर्वत सापडला आहे. येथील किवू या ठिकाणी एक पर्वत आहे. तिथे सोनं सापडत असल्याचे व्हि़डीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत काही मजूर खोदकामात सापडलेलं सोनं हाताळताना दिसत आहेत.

हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोनं शोधायला हजारो लोक या पर्वताच्या दिशेने धावले. तिथे बघ्यांची आणि शोधकर्त्यांची तोबा गर्दी उसळली. हे पाहून स्थानिक प्रशासनाने तिथे खोदकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

काँगोमध्ये सोनं सापडणं ही काही नवीन बाब नाही. काँगोत सोन्याच्या खाणी आहेत. तिथे मोठ्या प्रमाणावर सोन्यासाठी उत्खनन चालतं. तसंच संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार या देशातून सोन्याची तस्करीही बऱ्याच मोठ्या प्रमाणात होते.

हा पर्वतही सोन्याच्या खाणींच्या परिसरात आहे. मात्र, या खाणींवर नेमकी कुणाची मालकी आहे आणि सोन्याचं पुढे काय होणार हा निर्णय होईपर्यंत या जागी खोदकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या