कॉंग्रेस नेत्याच्या बर्थडे पार्टीत गोळीबार, एकाचा मृत्यू

923

पंजाबममध्ये काँग्रेस नेते परमिंदर सिंह पप्पू यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात काँग्रेसचे स्थानिक नेते मनजीत सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तर सुनील सैनी यांच्या पायावर गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी जसविंदर सिंह याला अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते परमिंदर सिंह पप्पू यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. बांधकाम व्यापारी असलेले पप्पू यांनी त्यांच्या वाढदिवसनिमित्त काही खास मित्रांसाठी लुधियाना येथील पॅव्हिलियन मॉलच्या चौथ्या मजल्यावरील रेस्टॉरंट्स कॅस्टेल बार्बेक्यू येथे पार्टीचे आयोजित केली होते. याच पार्टीमध्ये जसविंदर सिंह आणि मनजीत सिंह यांच्यात जोरदार वाद होऊन मारामारी झाली. या वादात जसविंदरचा मित्र जगदीप सिंह यांनीही उडी घेतली. यावेळी जसविंदर सिंह यांनी त्याकडे असलेली रिव्हॉल्वर काढून एका मागून एक अशा पाच गोळ्या झाडल्या. यामधली एक गोळी मंजीतला लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर या वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी पडलेल्या सुनील सैनी याच्या पायाला गोळी लागली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर मृत मनजीत सिंह याची पत्नी रणदीप कौर यांनी पोलिसांना दूरध्वनी करून घडलेल्या घटने बद्दल माहिती दिली. दरम्यान, पोलीस घटनासथळी दाखल झाले असून पोलिसांनी जसविंदर सिंह या आरोपीला अटक केली आहे. तर या घटनेतील आणखीन एक आरोपी असलेला जगदीप सिंह हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या