अर्णब गोस्वामीवर कारवाई करा; लातूरात काँग्रेसचे आंदोलन

देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोपनीय व संवेदनशील माहिती प्रसारित करत गोपनीयतेचा भंग करणारे अर्णब गोस्वामी याच्यावर तातडीने केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी मागणी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे. या मागणीसाठी तालुका, शहर, ग्राम पातळीवर तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार लातूर येथे काँग्रेसतर्फे काँग्रेस भवन समोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी धीरज देशमुख बोलत होते.

देशाचे पंतप्रधान, संरक्षण विभाग, गृह विभाग, प्रसारण मंत्रालय यांची संवेदनशील माहिती गोस्वामी याला कशी मिळते, असा सवाल देशमुख यांनी केला आहे. अशा प्रकारांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. गोस्वामी यांच्या वृत्तवाहिनीवर बंदी घालून केंद्र सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी देशभरात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या