शिवसेना पदाधिकारी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आणि काँग्रेस नगरसेवकाला अटक

199

सामना ऑनलाईन, नगर

केडगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणांमध्ये काँग्रेसचे नगरसेवक विशाल कोतकर याला पोलिसांनी आज पहाटेच्या सुमाराला कामरगाव इथून अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये आठ आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचाही समावेश आहे. केडगाव येथे शिवसेनेचे नगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती त्यांच्या हत्येमध्ये नगर जिल्ह्यातील अनेक बड्या राजकीय धेंडांचा समावेश आहे.

या पदाधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या संदीप गुंजाळ या गुंडाला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान संदीपने सांगितले की विशाल कोतकरच्या सांगण्यावरून हे हत्याकांड घडवून आणण्यात आले आहे. संदीपने ही माहिती दिल्यापासून पोलीस विशाल कोतकरच्या मागावर होते. अखेर त्याला पहाटेच्या सुमारास नगर तालुक्यातील कामरगावमधून अटक करण्यात आली. गुंजाळ हा हत्या झाल्याच्या दिवशी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता त्याने त्याच्याकडील पिस्तुलही पोलिसांकडे जमा केले होते. पोलीस तपासात त्याने हत्याकांडात सहभागी असलेल्या सगळ्यांची नावे सांगितली होती.

आपली प्रतिक्रिया द्या