ई शिवनेरीमध्ये आता शिवनेरी सुंदरी असणार आहे असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण शिवनेरी सुंदही देण्याऐवजी सुविधा द्या अशी मागणी काँग्रसने केली आहे. तसेच शिवनेरी सुंदरी देण्याऐवजी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार द्या असेही काँग्रेसने सुनावले आहे.
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) October 1, 2024
विमान प्रवासात ज्या प्रमाणे हवाई सुंदरी असतात, त्याच धरतीवर शिवनेरीमध्ये शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे. पण शिवनेरी सुंदरी नेमण्याऐवजी सुविधा द्या अशी मागणी काँग्रसने केली आहे. एक्सवर पोस्ट करून काँग्रेसने म्हटले आहे की, शिवनेरी सुंदरीपेक्षा आधी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार द्या, महिलांना बस स्थानकांवर सेवा द्या, पायाभूत सुविधांकडे लक्ष द्या, स्वच्छतागृहांसाठी निधी द्या, वेळेवर बससेवा द्या. आमचे इतकच म्हणणं आहे की, महायुती सरकारने एसटीमध्ये सुंदरी देण्याऐवजी सुविधा द्या अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
‘ई-शिवनेरी’ बसेसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’
शिवनेरी सुंदरीपेक्षा आधी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार द्या, महिलांना बस स्थानकांवर सेवा द्या, पायाभूत सुविधांकडे लक्ष द्या, स्वच्छतागृहांसाठी निधी द्या, वेळेवर बससेवा द्या. आमचे इतकच म्हणणं आहे की, महायुती सरकारने एसटीमध्ये सुंदरी देण्याऐवजी… pic.twitter.com/cedZcwjUkg
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 2, 2024