घरगुती गॅस सिलिंडरवरील जीएसटी हटवा, काँग्रेसची मागणी

18

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

या देशातील गरीब जनता महागाईमुळे भरडली जात असून घरगुती गॅस सिलिंडरवर ५ टक्के ‘वस्तू आणि सेवा कर’ (जीएसटी) लावण्यात आल्यामुळे त्यांच्यावर आणखी बोझा वाढणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेसाठी गॅस सिलिंडरवरील जीएसटी हटवा, अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरवर (एलपीजी) ५ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरची किंमत तब्बल ३२ रुपयांनी महागली आहे. धक्कादायक म्हणजे केंद्र सरकारने गॅस सबसिडीतही कपात केली असून, ‘जीएसटी’मुळे जनतेला भुर्दंड पडत आहे. दरम्यान, सबसीडी कपातीचे धोरण असेच राहिले तर गॅसचे दर आणखी भडकणार आहेत. तसेच नवे कनेक्शन, अतिरिक्त सिलिंडर, दोन वर्षांनी बंधनकारक असलेली गॅस तपासणीही आता महागली आहे. त्यावर तब्बल १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे सिलिंडरबरोबरच या सेवांचा भुर्दंडही जनतेवर पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या