काँग्रेस-राष्ट्रवादीला भायखळ्यात खिंडार, काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर शिवसेनेत

1786

भायखळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱयांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भायखळ्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून या मतदारसंघात शिवसेना अधिक मजबूत झाली आहे.

हेही वाचा- पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या ‘जेलर’सारखी झालीय, मुख्यमंत्र्यांचे शरसंधान

माजी नगरसेविका सुनीता शिंदे, माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील तसेच अरुण पवार, दिलीप पोखरकर, दादा सणस यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱयांनी व कार्यकर्त्यांनीही शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी, माजी मंत्री सचिन अहिर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या