पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी खासदाराला काँग्रेसमधून बाहेरचा रस्ता

1584

विधानसभा निवडणुकीला आता अवघे पाच दिवस बाकी आहेत. 21 तारखेला होणाऱ्या मतदान होणार असले तरीही अनेक पक्ष अद्यापही बंडखोरांना शांत करण्याच्या कामातच मग्न आहे. अधिकृत उमेदवाराविरोधात बंड करून अपक्ष उमेदवारी भरून पक्षाला नुकसान पोहोचवणाऱ्या बंडोबांविरोधात राजकीय पक्षांनीही आता दंड थोपटला असून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजपमधून 90 कार्यकर्त्यांची हकालपट्टी, यादी जाहीर

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडाची ठिणगी पडली आहे. आपल्या अधिकृत उमेदवाराविरोधात माजी खासदाराने दंड थोपटल्याने काँग्रेसने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध निवडणूक लढवत असल्याने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य गोदरू शामराव जुमनाके व माजी खासदार अनंत विठ्ठलराव देशमुख यांना काँग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी एक पत्रकर काढून याबाबत दिली आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य गोदरू जुमनाके हे काँग्रेस पक्षाचे सदस्य असतानाही ते राजुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात मैदानात उतरले आहेत. जुमनाके हे गणतंत्र पार्टीकडून निवडणूक लढत आहेत. त्यामुळे काँग्रेसने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दुसरीकडे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी रिसोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमित झनक यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे त्यांनाही पक्षातून हाकलून देण्यात आले आहे.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

आपली प्रतिक्रिया द्या