निवडणुका जिंकणं दूर, पक्षाचे भविष्यच अंधारात; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

767

 

काँग्रेस ज्या परिस्थितीत आहे त्यानुसार हरयाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका जिंकणे कठीण आहे. इतकेच नाही तर पक्षाचे भविष्यही अंधारात आहे असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केले आहे. तसेच राहुल गांधी यांनी नेतृत्व सोडले यामुळे पक्षापुढे अडचण निर्माण झाली असेही खुर्शीद म्हणाले.

एका वृत्तसंस्थेशी बोलतना खुर्शीद म्हणाले की, “lलोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पक्षावर संकट आणखीण गडद झाले. त्यांच्या या निर्णयानंतर पक्षाच्या पराभवाची योग्य कारणमीमांसा नाही झाली.” तसेच पक्ष इतका संकटात आहे की सध्या हरयाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका जिंकणे अशक्य आहे. पक्षाची अवस्था इतकी बिकट आहे की, पुढील भविष्यही अंधारात असल्याचे खुर्शीद म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या