नाणार’ला काँगेसचाही विरोध

सामना ऑनलाईन । नागपूर

कोकणामध्ये होऊ घातलेला नाणार प्रकल्प गुजरातमध्ये न्यावयाचा असल्याने भाजप लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नागपुरात केला.

नाणार प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नाणार प्रकल्पाच्या मुंबईतील कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. ताडदेव एसी मार्केटजवळील कार्यालयात सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास कार्यकर्ते कार्यालयात घुसले. खुर्च्या, दगड आणि काठय़ांनी मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना रात्री ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या