पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी गृहमंत्री, आमदार, खासदारांना काँग्रेसची नोटीस

3406
congress

उत्तर प्रदेशमध्ये पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या 11 बड्या नेत्यांना काँग्रेस पक्षाने नोटीस धाडली आहे. यामध्ये माजी गृहमंत्री, मंत्री, माजी आमदार, माजी खासदारांचाही समावेश आहे. या सर्वांना काँग्रेसने स्पष्टीरकरणासाठी 24 तासांचा अवधी दिला आहे. अन्यथा कडक कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे.

‘राज्यात काँग्रेसविरोधात काही लोकांच्या कारवाया सुरू आहे हे वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेस अनुशासन समितीच्या लक्षात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या निर्णयाविरोधात प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा धुळीस मिळत आहे. तुमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांकडून अशी अपेक्षा नव्हती. तुमचे हे आचरण पक्षाची निती व आदर्शांच्या विरुद्ध आहे. या प्रकरणी पुढील 24 तासात स्पष्टीकरण देण्यात यावे, अथवा कडक कारवाई करण्यात येईल’, अशी नोटीस काँग्रेसने पक्षातील नेत्याना धाडली आहे.

या नोटीसमध्ये माजी गृहमंत्री रामकृष्ण द्विवेदी, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी खासदार संतोष सिंह माजी आमदार भूधक मिश्रा आणि हाफिज उमर यांचाही समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या