काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला महिलांनी फिरवली पाठ, अवघ्या 6 ते 7 महिला

33

सामना प्रतिनिधी । पाथरी

शहरातील जिल्हा परिषद मैदानावर घेण्यात आलेल्या काँगे्रसच्या जनसंघर्ष यात्रेला सोमवारी केवळ 7 महिलांनी हजेरी लावल्याने या संघर्षयात्रेला महिलांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसले. त्यामुळे काँग्रेसची जनसामान्यातून मंदावलेली गतीही पाथरी येथील घेण्यात आलेल्या सभेच्या माध्यमातून निदर्शनास आली.

तुळजापूर येथील तुळजापूर येथून सुरु झालेली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पाथरी शहरात सभेच्या रुपात जनतेसमोर मांडण्याचा केवीलवाना प्रयत्न करण्याचीवेळ काँग्रेवर आल्याचे चित्र पाथरी शहरात पहावयास मिळाले. खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेली आजची सभा म्हणाजे, महिलांनी नाकारलेली सभा असे म्हणणे वागवे ठरणार नाही. कारण पाथरी येथील सभेसाठी काँग्रेसच्या नेत्यावर जिल्हाभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते जमा करण्याची वेळ आली. त्यामध्ये केवळ 6 ते 7 महिलांनीच या सभेसाठी हजेरी लावल्याने एकेकाळी गोरगरीब महिलांची आधार असलेली काँग्रेस आता जनसामान्यांच्या नजरेतून उतरल्याचे चित्र पाथरी येथील सभेच्या माध्यमातून निदर्शनास आले.

शुक्रवारी 29 रोजी काँग्रेसची नियोजित 2 वाजेची सभा कार्यकर्ते न जमल्याने उशीराने सुरु झाली. या सभेमध्ये आमदार विजय वडीट्टीवार यांची मोदींवर टीका करताना चांगलीच जीभ घसरली. या सभेसाठी आटापिटा करुन जमविलेल्या कार्यकर्त्यांना साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याने कार्यकर्त्यांमधून काँग्रेस पक्षांच्या नेत्याविषयी नाराजीचा सूर उमटल्याचे चित्रही स्पष्ट झाले.

आपली प्रतिक्रिया द्या