अभिनंदन यांच्या मिशांची स्टाइल ‘राष्ट्रीय मिशी’ म्हणून घोषित करा!

wing-commander-abhinandan-v

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे हीरो आणि हिंदुस्थानच्या हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या मिश्यांची स्टाइल ‘राष्ट्रीय मिशी’ म्हणून घोषित करण्याची मागणी काँग्रेसने लोकसभेत केली. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी अभिनंदन वर्धमान यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात यावा अशी मागणीही यावेळी केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीत विंग कमांडर अभिनंदन यांच्या नावाचा उपयोग केल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर सडकून टीका केली. अभिनंदन यांनी गाजवलेल्या शौर्याबाबत आणि त्यांच्या साहसाबाबत देशाला गर्व आहे. त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी शौर्य पुरस्कार देण्यात यावा. त्यांच्या मिश्यांचे सोशल मीडियावरही कौतुक झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मिश्यांना राष्ट्रीय मिश्या अशी ओळख मिळावी, असेही ते म्हणाले.