राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास केला जातोय, जयराम रमेश यांचं सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

jairam-ramesh

राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. हा ‘अमृतकाल’ नसून ‘आपत्काल’ आहे, अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे. संसदेत विरोधकांचा आवाज दाबायचा आणि संसदेचं कामकाज सुरळित होऊ द्यायचं नाही, असे प्रकार सुरू असल्याचंही ते म्हणाले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेकडे त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकारवर टीका करताना जयराम रमेश म्हणाले की, तृणमूल काँग्रेस वगळून उर्वरित 16 विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणासंदर्भात संयुक्त संसदीय समितीची मागणी केली आहे. सत्ताधारी राहुल गांधी यांच्या विधानाचा विपर्यास करत आहेत, जेणेकरून समिती गठनाच्या मागणीवरून लक्ष विचलित करता येईल. आमच्या वक्तव्यांचा विपर्यास केला जा आहे. ही हुकूमशाही आहे. हा ‘अमृतकाल’ नसून ‘आपत्काल’ आहे. संसदेचं कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण, संसदेत विरोधकांचा आवाज दाबायचा आणि संसदेचं कामकाज सुरळित होऊ द्यायचं नाही, हे प्रकार सुरू आहेत, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.

भारत जोडो यात्रेची सांगता होऊन 45 दिवस झाले आहेत. दिल्ली पोलीस आता 45 दिवसांनी त्या यात्रेविषयी चौकशी करत आहेत. जर त्यांना त्यांच्या विधानाविषयी इतकाच आक्षेप होता, तर त्यांनी फेब्रुवारी महिन्यात ही कारवाई का केली नाही. राहुल गांधी यांच्याकडील कायदेतज्ज्ञांचं पथक या सगळ्याला कायदेशीर मार्गाने उत्तर देईल, असंही जयराम रमेश यावेळी म्हणाले.