काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गांधी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.


ट्विटमध्ये राहुल यांनी म्हटले आहे की, मला कोरोनाची हलकी लक्षणं दिसत असून माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या जे कोणी संपर्कात आले आहेत त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले आहे.

यापूर्वी माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या