शेतकरी विधेयकावरून सिद्धू संतापले, शायरीतून केला केंद्रावर हल्लाबोल

शेतकरी विधेयकावरून पंजाब-हरियाणासह देशातील विविध भागांमध्ये निदर्शनं, आंदोलनं सुरू आहेत. विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत टीकेची झोड उठवली आहे. या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी शायरीतून केंद्रावर हल्लाबोल केला आहे.

माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आवाज-ए-किसान म्हणत पुढे शायरी लिहिली आहे. – ‘ जिन्हें हम हार समझे थे गला अपना सजाने को, वही अब नाग बन बैठे हमारे काट खाने को।’ (आपल्या गळ्याची शोभा वाढवण्यासाठी आम्ही ज्यांना हार समजत होतो, तेच आता आमच्या गळ्यातील नाग होऊन आम्हाला दंश करण्यासाठी निघाले आहेत.)

पुढेही ते म्हणतात, ‘काळं विधेयक पास, पैसेवाल्यासाठीचा रस्ता साफ. शेतकऱ्यांच्या मार्गावर काटे, पैसेवाल्यांच्या मार्गावर फूल, महागात पडणार ही चूक.’ काँग्रेसने आपल्या मागण्या केंद्रापुढे ठेवल्या आहेत. यामध्ये एमएसपी खाली खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून उत्पादन खरेदी करू शकणार नाही, स्वामीनाथन फॉर्म्युल्यावरच एमएसपीचा दर निश्चित व्हावा, केंद्र सरकार – राज्य सरकार – फूड कारपोरेशन ऑफ इंडिया यांनी एमएसपी पेक्षा कमी दरात उत्पादन खरेदी केले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशा तीन मागण्या काँग्रेसने समोर ठेवल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या