प्रियंकांनी केला इंदिरा गांधींच्या ‘इटली प्रेमाचा’ खुलासा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रचारासाठी केरळच्या दौऱ्यावर आहे. तिसऱ्या टप्प्यात देशभरात 115 जागांसाठी मतदान होणार असून यातील 20 जागा केरळमधील आहे. केरळमधील अरिक्कोड येथे प्रचार सभेदरम्यान प्रियंकांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या ‘इटली प्रेमाचा’ खुलासा केला आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, अनेकांना माहिती नाही की माझी आजी इंदिरा गांधी फुटबॉलच्या चाहत्या होत्या. 1982 मध्ये आम्ही फुटबॉल विश्वचषकाची फायनल पाहातो होतो. त्यावेळी आजीला विचारले की तुम्ही कोणाला पाठींबा देत आहात. तर त्यांनी म्हटले की आज हिंदुस्थान तर खेळत नाहीये, त्यामुळे मी इटलीला पाठींबा देत आहे. इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे भाऊ राहुल गांधी आणि माझी दोन्ही मुले फुटबॉलचे चाहते असल्याचे त्या म्हणाल्या.

राहुल गांधींना मतदान करण्याची आवाहन
अरिक्कोड यांनी प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासाठी वायनाड येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी राहुल गांधींना मतदान करण्याचे आवाहन केले.