Video – नव्या कृषी कायद्यामुळे धान्यांचे भाव गगनाला भिडतील, राहुल गांधी यांची टीका

नवे कृषी कायद्यांमुळे मध्यम वर्गाचे हाल होतील तसेच धान्याचे भाव गगनाला भिडतील अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. कृषी कायद्यावरून देशात आंदोलन सुरू आहे. गेल्या 53 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, कृषी कायद्यामुळे फक्त शेतकऱ्य़ांचे नुकसान होणार नाही. या तीन कायद्यांमुळे मध्यम वर्गाचे कंबरडे मोडेल. या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती नष्ट होईला आणि धान्याचे भाव गगनाला भिडतील. पंतप्रधान मोदी आपले जवळचे पत्रकार आणि भांडवलदार मित्रांसाठी काम करत आहेत. हे सत्य असून सगळ्यांना हे माहित असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या